नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या ताजाबाद उर्दू माध्यामिक शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय माध्यामिक शिक्षा अभियानअंतर्गत ब्युटी ॲण्ड वेलनेस आणि टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी हे व्यवसायिक शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीच्या शासनाच्यावतीने बांधण्यात येणार असलेल्या बांधकामाचे भूमीपूजन गुरूवार (ता.११) ला क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका रिता मुळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या शिक्षण अभ्यासक्रमातून मनपाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. यातूनच मनपाचे विद्यार्थी प्रगल्भ होतील, असा विश्वास सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला. मुलांमधील खेळवृत्ती जागृत करण्यासाठी मनपाद्वारे विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती सभापती नागेश सहारे यांनी दिली.