Published On : Sun, Dec 26th, 2021
By Nagpur Today Nagpur News

प्रत्येक मेट्रो स्थानकांवर सायकल उपलब्ध

Advertisement

नागपूर : महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील प्रत्येक मेट्रो स्थानकांवर प्रवाश्यानकरिता सायकल ठेवण्यात आल्या असून या सायकल ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मेट्रो स्थानकांवर ठेवण्यात आलेल्या सायकल या माय-बाईक व व्हीआयपीएल कंपनीच्या आहेत. या सर्व सायकल ऍप बेस्ड असून नागरिक सहज पणे सायकल मेट्रो स्थानकावरून घेऊ शकतात.

मेट्रोचा प्रवास होताच मेट्रो स्थानकावरून सायकल घेत आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत या सायकलचा उपयोग करता येऊ शकतो तसेच या सायकल आपण महिन्याभराकरिता देखील प्राप्त करू शकतात.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल्या सायकल प्रतिदिन,आठवडा तसेच एक महिन्याकरिता उपलब्ध आहे. २ रु. प्रति तास ते ४७९/५९९ रु. प्रति महिना या दराने उपल्बध आहे.

मुख्य म्हणजे मेट्रो स्थानकावर नागरिक, शाळा व कॉलेज येथील मुले प्रतिदिन मेट्रो ने प्रवास करीत आहे व मेट्रोचा प्रवास पूर्ण झाल्यावर मेट्रो स्टेशन येथून सायकलचा उपयोग करीत आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून सकाळी ६.३० वाजता पासून ते रात्री ९. ३० वाजता पर्यंत मेट्रो सेवा सुरु आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट असून जे दररोज सायकल ने प्रवास करून कॉलेज, ऑफिस तसेच इतर ठिकाणी ये जा करतात. सायकल मेट्रो सोबत सायकलचा प्रवास करने आता सोईस्कर झाले आहे. मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरत आहे.

•मनपाच्या फिडर बस सेवा देखील मेट्रो स्थानकांवर उपलब्ध :
खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु असून प्रवाश्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. बुटीबोरी आणि हिंगणा या ठिकाणी शहरातून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात.

खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एम.आय.डी.सी.गेट : खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) व बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत नागपूर महानगरपालिका द्वारा आपली बस सेवा सुरु आहे.

•लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल:* लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल व हिंगणा शासकीय हॉस्पिटल ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान देखील आपली बसची सेवा फिडर सर्विस म्हणून प्रवाश्यान करीता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी : महा मेट्रोने नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने पाऊले उचलली असून जास्तीत जास्ती प्रवाश्याना मेट्रोने जोडण्याचा मुख्य मानस आहे. ज्यामध्ये शहरातील इतर भागांना मेट्रो स्टेशनशी फिडर सर्विसच्या माध्यमाने जोडण्यात आले आहे. सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथून पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर,राजापेठ, म्हाळगी नगर,न्यू सुभेदार नगर,अयोध्या नगर,रघुजी नगर,हनुमान नगर,मेडिकल चौक,बस स्टेशन, कॉटन मार्केट,धरमपेठ, शंकर नगर,रामनगर,रविनगर,डब्ल्यूसीएल कॉलोनी, सेमिनरी हिल, हजारी पहाड या सर्व मार्गावर प्रवाश्यान करिता सुविधा उपलब्ध आहे.

Advertisement