नागपूर: समाजकारणाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करा. ही सेवा करण्याची संधी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तसेच निसर्गाचा समतोल कायम राखण्यासाठी जलसंधारण आणि वृक्षारोपण करून या दोन्ही क्षेत्रात युवकांनी आपले सक्रिय योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बिडगाव येथे श्री श्री फाऊंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी भाजप नेते अनिल निधान, रमेश चिकटे, सभापती अनिता चिकटे, नरेश मोटघरे, मनोज चवरे, राजकुमार घुले पाटील, निकेश कातुरे, योगेश बाख, पांडुरंग आबिलडुके, रमेश कातुलरे, राजेश्वर आकरे, सावना चाचंभारे, मीराबाई काळे, विशाल चामट, संतोष तिजारे, सचिन घोडमारे आदी उपस्थित होते.
या शिबिरात झालेल्या रुग्णांच्या तपासणी एचएलएल लॅबतर्फे करण्यात आल्या. 425 नेत्र रुग्णांच्या तपासण्या झाल्या यापैकी 78 जणांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. 347 जणांना चष्मे वाटप करण्यात आले. 87 महिला पुरुषांची ईसीजी तपासणी करून घेतली. 330 जणांनी रक्तदाबाची तपासणी केली. दंत विभागाने 117 जणांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले. किडणीची 18 जणांनी तपासणी करून घेतली. छातीची 41 जणांनी तपासणी करून घेतली. हृदयरोग विभागाने 29 जणांची तपासणी केली असता 2 ज़णांना अँजिओग्राफीचा सल्ला देण्यात आले. मधुमेहाची 239, जनरल मेडिसिन विभागाने 291 जणांची तपासणी केली, तर स्त्री रोग विभागाने 77 जणांची तपासणी केली. मेंदू व मुत्र रोगाच्या डॉक्टरांनी 161 जणांची तपासणी केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश बोंडे, राजेश गोल्हर, कपिल आदमने, विकास धारपुडे, गायधने, प्रीतम लोहासारवा, बापुराव सोनवणे, सारंग पिंपळे, जितू मेरकुळे, विनोद वाठ, दामोदर वाडीभस्मे, फुलझेले, अजय बिसेन, सचिन घोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.