नागपूर : शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई करत एकूण १० ठिकाणी धाड टाकली आहे. हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांवर आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये डिब्बा व्यासायिक रवि अग्रवाल, लाला जैन, हवाला व्यावसायिक शैलेश लखोटिया, पारस जैन, करनी थवारानी , प्यारे खान, गोपी मालू, हेमंत तन्ना , इजराइल सेठ, रवी वानखेडे यांच्या 10 ठिकाणावर आयकर विभागाने धाड टाकली.
यातील रवी अग्रवाल यांचा कारभार नागपूर व्यतिरिक्त मुंबईतही सुरु आहे. त्यांचा छतरपूर फार्म नागपुरात प्रसिद्ध आहे. अग्रवाल यांचे नाव २०१५ पासून डिब्बा व्यावसायिकांमध्ये जोडले गेले.यानंतर ते ईडीच्या रडावरही होते. ईडीच्या तपासात समोर आलेल्या बाबींवरून आयकर विभागाने ही छापेमारी केल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून यात नागपूरच्या एकाही अधिकाऱ्यांचा सहभाग नाही.
नागपूर शहरात हवाला आणि डिब्बा टोळी सक्रिय आहे. रवी अग्रवाल यांची एल-७ ही कंपनी २००८ ते २०१५ च्या दरम्यान पूर्ण ताकदीने यात सहभागी होती. यात करनी थावरानी , गोपू मालू आणि हेमंत तन्ना ,इजराइल सेठ हे देखील सहभागी होते. यातील सेठ यांचा जरीपटका क्षेत्रात ‘जिंजर मॉल’ आहे.
यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती . तत्कालीन डीसीपी दिपाली मासरीकर यांनी अग्रवाल यांच्या विरोधात ही कारवाई केली होती.
दरम्यान आयकर विभागाने कारवाई केलेले सर्व व्यावसायिक हवाला, बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता झाल्यामुळे ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. 10 हून अधिक ठिकाणी आयकराचे (Income Tax) छापे पडले असून छापे टाकण्यासाठी मुंबईतील पथक पहाटे नागपुरात दाखल झाले. जवळपास १५० अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांमध्ये नागपूरच्या अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा आयकर विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.