Published On : Tue, Feb 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा ; नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद !

Advertisement

नागपूर : राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून मोठी मदत मिळणार असल्याचे पवार म्हणाले. या अर्थसंकल्पात नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात ‘या’ महत्त्वाच्या घोषणा-
-राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.
– 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे.
– जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
– नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.
-⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
⁠- नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.
– वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.
– शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार
– केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे
– महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार
– हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे
-जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे. -रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी
-मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे
-संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे
– वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे
– नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
– निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement