Advertisement
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी भाजपाविरोधात मोट बांधली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या विकासासाठी जनसेना आणि टीडीपी गरजेची आहे असे त्यांनी म्हटले. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीची ताकद वाढतांना दिसत आहे.
टीडीपी एक मजबूत पक्ष आहे. आंध्र प्रदेशच्या सुशासन आणि विकासासाठी तेलुगु देशम पार्टीची गरज आहे.
आज टीडीपी संघर्ष करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या काळात टीडीपीला जनसैनिकांच्या युवकांची गरज आहे. जर टीडीपी आणि जनसेना एकत्र आली तर राज्यात वाएसआरसीपीची सरकार कोसळेल असा विश्वास जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी व्यक्त केला.