मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर.
अंतुले यांचे जावई आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले मुश्ताक अंतुले काँग्रेसला रामराम करत आज अजित पवार गटाचा झेंडा हाती घेणार आहेत.
माजी आमदार असलेल्या मुश्ताक अंतुले यांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे.
अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांची ताकद वाढणार आहे.