Published On : Thu, Jul 4th, 2024

काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा झटका;बँक घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Advertisement

नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. एनडीसीसी बँकेच्या बहुचर्चित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवले होते. 22 डिसेंबर 2023 रोजी न्यायालयाने त्याला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 12.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

दरम्यान नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. केदार या खटल्यातील मुख्य आरोपीही आहेत. खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. त्यानंतर केदार यांच्यासह काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Advertisement