मुंबई :आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली असून, गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोविडनंतर प्रथमच इतकी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. निफ्टीमध्ये 1000 अंकांची, तर सेन्सेक्समध्ये 3000 अंकांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे बाजार भांडवलात 19 लाख कोटी रुपयांहून अधिक गमावले गेले आहेत.
बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं-
अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि जागतिक परिणाम-
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे जागतिक आर्थिक स्थैर्य डळमळीत झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली.
आशियाई व युरोपीय बाजारात कमजोरी-
जपान, दक्षिण कोरिया, चीन व हाँगकाँगसारख्या प्रमुख बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. हँग सेंग निर्देशांकात तब्बल 10.5% घसरण ही विशेषतः चिंताजनक ठरली.
अमेरिकेत मंदीची भीती अधिक तीव्र-
अमेरिकेतील महागाई वाढीमुळे ग्राहकांचा खर्च आणि उद्योगांचा नफा दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम जागतिक बाजारांवर होतोय.
व्यापार वाद आणि आर्थिक दबाव –
अमेरिका-चीन व्यापार संघर्ष पुन्हा उफाळल्याने जागतिक व्यापारावर धोका निर्माण झाला आहे. यामुळे भारतासह सर्व देशांतील उद्योगांवर दबाव वाढतोय. गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव-बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदार सरकारी सिक्युरिटीज व ट्रेझरी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. परिणामी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.