Published On : Tue, Mar 12th, 2024

राज ठाकरे यांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’ !

Advertisement

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. यातच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला.वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.यासंदर्भात त्यांनी स्वतः पोस्ट करत माहिती दिली.

अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाची साथ सोडली. पुण्यात वसंत मोरे यांची ताकद आहे. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत.

Advertisement

यासंदर्भात राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत. मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही? याबाबत कोणतीच चर्चा समोर आलेली नाही. मोरे यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहावे लागेल.