Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात येणा-या बांबू उपवन वाचनालयाचे गुरूवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका रूपा रॉय, उज्जवला शर्मा, अज्जु छाबरानी, दिलीप मोहितकर, प्रणय पराते, अजय तायवाडे, मिलिंद राऊत, ज्ञानेश्वर खरात, जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, अनुसया छाबरानी प्रामुख्याने उपस्थित होते.
धरमपेठ झोनमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या या बांबू उपवन वाचनालयामुळे परिसरातील नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे, असा विश्वास यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.