नागपूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे, असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या विधानानवरून देशभरात त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
या वादग्रस्त वक्तव्यविरोधात भाजप नेते, कार्यकर्ते राज्यभरात रस्तावर उतरले आहेत. नागपुरातही त्यांचे पडसाद पाहायला मिळाले. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत प्रियांक खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत राग व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी खर्गे, राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणा दिल्या.