मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर दुसरे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होते.
मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातल्याच नेत्यांचा समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वगळले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५० नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहीजेत, असा नियम आहे.त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले होते.
दरम्यान लोकप्रतिनिधी कायदा, १९५० नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहीजेत, असा नियम आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.भाजपाने २७ मार्च रोजी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. आता भाजपाने आता नवी यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.