Published On : Thu, Nov 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपाकडून विधानसभेच्या तोंडावर 40 बंडखोर नेत्यांची हकालपट्टी

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कठोर पाऊले उचलली आहेत. महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत भाजपकडून एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘या’ बंडखोर नेत्यांना केले पक्षातून निष्कासित-
धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील , जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे,अकोट – गजानन महाले, वाशिम – नागेश घोपे, बडनेरा – तुषार भारतीय, अमरावती – जगतीश गुप्ता, अचलपूर – प्रमोद गडरेल,साकोली – सोमदत्त करंजेकर, आमगाव – शंकर मडावी , चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली, अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल, नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरेघण, सांवगी – सतीश घाटगे, जालना – अशोक पांगारकर,गंगापूर – सुरेश सोनवणे, वैजापूर – एकनात जाधव, मालेगाव – कुणाल सूर्यवंशी, बागलान – आकाश साळुंखे, बागलान – जयश्री गरुड, नालासोपारा – हरिष भगत, भिवंडी – स्नेहा पाटील,कल्याण – वरुण पाटील मागाठणे – गोपाळ जव्हेरी ,जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू, अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल, नेवासा – बाळासाहेब मरकुटे, सोलापूर – शोभा बनशेट्टी , अक्कलकोट – सुनिल बंडकर, श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते,सावंतवाडी – विशाल परब अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.

Advertisement