नागपूर: शिर्डी येथे सुरू झालेल्या भाजप अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मित शहा म्हणाले की, शरद पवार यांनी १९७८ पासून सुरू केलेले विश्वासघाती राजकारण जनतेने २० फूट जमिनीखाली गाडले आहे. ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखविली आहे.
शहांच्या या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रात फसवणुकीचे आणि तोडाफोडीचे राजकारण भाजपने सुरू केले आहे.“महाराष्ट्रात भाजपने प्रथम शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.
त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे विश्वासघाती राजकारण सुरु केले. तसेच भाजप नेते पवार साहेबांचे राजकारण संपवण्याची भाषा करतात त्यांनी हे समजून घ्यावे की पवार साहेबांचे राजकारण कोणीही संपवू शकत नाही.असेही देशमुख म्हणाले.