संभाजीनगर: शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नसून त्याला वैयक्तिक कारणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केले . आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे .
कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना अत्महत्या सारखे पाऊल उचलावे लागते . सातत्याने पडणारा दुष्काळ, गारपीट, शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव यामुळे शेतकरी संकटात येतो . या समस्यांवर तोडगा न काढता भाजपचे सावे यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी आत्महत्यांची टिंगल उडवली .
कोणाच्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज असते, कुणाच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असतो त्यातून आत्महत्या होतात. या आत्महत्यांचा सरकारशी काडीमात्र संबंध नसल्याचा कांगावा त्यांनी केला.
नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत, त्याच्या आत्महत्येचे कारण वैयक्तिक आणि निराळेच असते असे विधानही त्यांनी केले .