नागपूर: विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची निवड झाली. सभागृहात एकमताने शिंदे यांची निवड करण्यात आली.
यापूर्वी प्रा. ना. स. फरांदे यांनी हे पद भुषवले आहे. फरांदे यांच्यानंतर सभापतीपद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले.
आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले.