Published On : Fri, Nov 8th, 2019

भाजप पदाधिकाऱ्याचा ट्रक दुचाकी अपघातात जागीच मृत्यू

Advertisement

कामठी :-स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया पुलिया जवळील अकील चिकन सेंटर जवळ कामठी हुन नागपूर कडे भरधाव वेगाने जात असलेल्या 14 चाकी ट्रक ला सारख्या दिशेने जात असलेल्या दुचाकी चालकाला दिलेल्या धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दुवी घटना आज 8 नोव्हेंबर ला शुक्रवारी दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव अरुण पोटभरे वय 40 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.मृतक हा भाजप चा कामठी तालुक्याचा पदाधिकारि असून येरखेडा ग्रा प चा माजी सदस्य होता.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक अरुण पोटभरे हा भाजप युवा मोर्चा कामठी तालुक्याचे माजी अध्यक्ष होते .हे स्वतःच्या खाजगी कामानिमित्त ऍक्टिवा क्र एम एच 40 बी आर 4770 ने एस बी आय चौकाकडे जात असता सारख्याच दिशेने समोरून जात असलेल्या चौदा चाकी ट्रक क्र सी जी 04 एल सी 9681 शी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जख्मि होऊन खाली पडला तर ट्रकचालक घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले होते दरम्यान घटनास्थळाच्या बाजूला उभे असलेल्या तरुणांनी मदतीची धाव घेत नजीकच्या आशा हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र तोवर जख्मि तरुणाने जीव सोडून जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच पोलिसानी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणी साठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच अपघाती ट्रक व दुचाकी ताब्यात घेत आरोपी ट्रक चालक उमेश भोलानाथ यादव वय 36 वर्षे रा टेका नाका नागपूर वर कायदेशीर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले.मृतकाच्या पाठिमागे आई वडील, पत्नी , एक मुलगा , एक मुलगी तसेच तीन भाऊ व चार बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

बॉक्स:-कामठी नागपूर महामार्गावरील एस बी आय चौकाजवळील सुरू असलेल्या बागडोर नाला पुलिया विस्तारित बांधकामासाठी दोन पदरी रस्त्यापैकी एक पदरी रस्ता हा बंद करण्यात आला होता परिणामी या मार्गाहून धावनारे वाहतूक एक पदरीच होते तसेच रस्ता बांधकाम करणारे कंत्राटदार के सीसी कंपनी वाल्याकडून सावधानता बाळगण्याचा दृष्टिकोनातून कुठलेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नव्हते तसेच हा अपघात केसीसी च्या हलगर्जीपणा मुळे झाला असल्याचा आरोप करीत मृत्यूस जवाबदार असलेल्या के सीसी कंपणी ने मृतकाची नुकसान भरपाई भरून द्यावी असा आरोप करीत कामठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी समोर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करून काही काळ तणावपूर्ण वातावरण करीत प्रशासनाला वेठीस धरण्यात आले होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement