नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून डावलण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असणारे फडणवीस यांची ताकद आता हळूहळू कमी होतांना दिसत आहे. यातच केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचे कट्टर विरोधी असलेले विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान दिल्याने उपमुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. हा फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्काच मानला गेला. फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठीच्या या निर्णयाला स्वीकारून उपमुख्यमंत्री पद घेतले . मात्र आता अजित पवार हे शिंदे गट आणि भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले. आता महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे विरोधकांनी याचा विरोध केला आहे.
अजित पवार एकहाती भाजपच्या युतीचे सरकार सांभाळू शकतात. त्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनी गरज उरलेले नाही. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकार चालवण्यासाठी भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या जागी उत्तम पर्यायही मिळाला असल्याचे बोलले जात आहे. हे पाहता आगामी निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस यांना भाजप डावलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.