Published On : Thu, May 18th, 2023

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा तथाकथित पीए निघाला भाजपचाच कार्यकर्ता

आमदारांना मंत्रिपदाचे आमिष देत पैश्याची मागणी
Advertisement

नागपूर: भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून देशभरातील आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्या नीरजसिंह राठोड याला नागपूर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. महत्त्वाचे म्हणजे नीरज हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. इतके नाही तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही तो सक्रिय असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

नागपूरमधील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी निरीज विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

Advertisement

अहमदाबाद येथील नीरजसिंह राठोड हा उच्चशिक्षित असून बेरोजगार आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असून भाजपचा सदस्य म्हणून काम करीत होता.

. नीरजने भाजपची कामाची पद्धत समजून घेतली. अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभांमध्ये त्याने सहभाग घेतला. त्यानंतर नड्डा यांच्या नावाचा वापर करून एका साथीदाराच्या मदतीने भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैसे मागितले.

यात नागपूरचे आ. विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, आ. तान्हाजी मुटकुळे, बदनापूरचे आ. नारायण कुचे, राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांना मंत्रिमंडळात मंत्रीपदाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली. या सातपैकी दोघांनी तर नीरजच्या खात्यात पैसे पाठवल्याची माहिती आहे. मात्र या आमदारांनी बदनामीच्या भीतीने चुप्पी साधली आहे.