Advertisement
नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (ता.१८) भारतीय जनता पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले. शहराचे महापौर संदीप जोशी आणि भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमी जवळील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक स्थळी पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.
यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयातही अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राला ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अशोक मेंढे, सुभाष पारधी, सतीश शिरसवान, राहूल झांबरे, मनीष मेश्राम, राहूल मेंढे, नगरसेवक लखन येरावार, शंकरराव वानखेडे, बंडू गायकवाड, अजय करोसिया, इंद्रजीत वासनिक, रोहित बढेल, सोनू बमनेट, प्रमोद संतापे, विनायक इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.