Published On : Thu, Oct 5th, 2023

मित्रांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत ; बच्चू कडू संतापले

Advertisement

नागपूर : राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडूदेखील एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत भाजपसोबत सत्तते सहभागी झाले.

परंतु, त्यांना अद्यापही शिंदे गट किंवा भाजपाने मंत्रिपद दिलं नाही. तसेच अलिकडच्या काळात बच्चू कडू आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळाले. यावर बच्चू कडू आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करत आहेत.

Advertisement

भाजपाकडून मला त्रास होतोय, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत, असा घणाघातही कडू यांनी केला. ते अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावले पाहिजे, असे कडू म्हणाले.