भंडारा : भंडारा विधानसभेबाबत महायुतीमध्ये संघर्ष वाढला आहे. या जागेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्याचवेळी ही जागा निश्चितपणे भाजपकडे जाईल, असे भाजप नेते सांगत आहेत. अरविंद भालाधरे यांनी 2019 मध्ये भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती.
नरेंद्र भोंडेकर यांनी येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने भोंडेकर यांचा विजय निश्चित होता. विजयी झाल्यानंतर भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.
मात्र शिवसेना वेगळी झाल्यानंतर नरेंद्र भोंडेकर शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र आता भाजप भंडारा विधानसभेवरही जोरदार दावा करत आहे.
त्यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळेल की नाही, अशी शंका असल्याने भोंडेकर यांनी स्वतंत्र तयारी केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.