भाजपाच्या ‘संघटन पर्व’ अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे १३,१४,१५ फेब्रुवारी असे तीन दिवसांच्या महाराष्ट्र प्रवासावर आहेत.
कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण या प्रवासात सोबत असणार असून, राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत.
गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी अकोला येथे हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी ३ नागपूरच्या जगनाडे चौकातील हॉटेल रिजंटा येथे पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरात कृष्ण ग्रीन लॉन कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शुक्रवारी, १४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नांदेड येथे भक्तिलॉन येथे बैठक घेतील. दुपारी ३ वाजता गुरु लॉन्स अँड फंगशन हॉल, छत्रपती संभाजी नगर येथे बैठक होणार आहे.
शनिवार,१५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे बैठक होणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नाशिक येथील लंडन पॅलेस हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.