सुरत उत्तर विधानसभा क्षेत्रात प्रचाराची जबाबदारी
सुरत : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात ते सहभागी होणार आहेत.
दिल्ली येथून शुक्रवारी श्री बावनकुळे दुपारी सुरत येथे पोहचले. सुरत मधील मिनी भारत नावाने ओळखल्या जाणाऱ्या व मराठी भाषिक बहुल लिंबायत विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगिता पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते उपस्थित राहणार आहे. लिंबायत विधानसभा मतदार संघात मतदारांशी संपर्क साधतील. दरम्यान तेथील भाजपा पदाधिकारी , बूथ प्रमुख, विविध आघाड्या प्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकाना उपस्थित राहून मार्गदर्शन करतील .या दौऱ्यात विविध जनसंपर्क यात्रामध्ये देखील सहभागी होतील.
गुजरात भाजपा चे प्रदेश अध्यक्ष श्री सी आर पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी त्यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणार आहेत.