Published On : Mon, Mar 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपने २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक कोट्यवधींच्या रोख्यांचा वापर!

नागपूर : निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या निवडणूक रोख्यांवरून राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत वटवल्या गेलेल्या 12,769 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांपैकी जवळपास निम्मे रोखे सत्ताधारी भाजपला मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाजपने यापैकी किमान साडेसतराशे कोटींचे रोखे भाजपने 2019च्या लोकसभा निवडणूक काळात वटवले असल्याचे दिसून येत असल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने दिले आहे.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपने एप्रिल 2019मध्ये 1,056.86 कोटी रुपये आणि मेमध्ये 714.71 कोटी रुपयांचे रोखे वटवून काढून घेतले होते. नोव्हेंबर 2023मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, ऑक्टोबरमध्ये 359.05 कोटी रुपये आणि नंतर 702 कोटी रुपये वटवण्यात आले. भाजपने या सगळय़ा कालावधीत 8,633 निवडणूक रोखे वटवले. फेब्रुवारी 2020 (रु. 3 कोटी), जानेवारी 2021 (रु. 1.50 कोटी) आणि डिसेंबर 2023मध्ये (रु. 1.30 कोटी) असेही रोखे भाजपकडून वटवले गेले आहेत.

उत्तर प्रदेश,उत्तराखंड,पंजाब,मणिपूर आणि गोवा विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना जानेवारी 2022मध्येही 662.20 कोटी रुपयांचे रोखे वटवले गेले.नोव्हेंबर 2022 मध्ये, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असतानाही रोखे वटवले गेले होते. या वर्षी जानेवारीमध्ये, काँग्रेसने 35.9 कोटींचे रोखे वटवले, तर भाजपने त्याच कालावधीत 202 कोटींचे रोखे वटवल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement