मुंबई : कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालावर भाष्य करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅग अहवालाच्या माध्यमातून भाजपचे पक्षश्रेष्ठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. कारण त्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींनाच धारेवर धरले.
केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर गडकरींनी चांगली कामगिरी केली आहे.
त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकते,असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
कॅगच्या अहवालातून मोदी सरकारचा भ्रष्टाचार समोर आला. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करणार याकडे आमचे लक्ष असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.