नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उत्तमरित्या आगेकूच करीत राहिल, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.
श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल ॲड. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विदर्भातील ओबीसी समाजाचे नेते म्हणून समाज मान्यता आहे. त्यांच्या नेमणुकीने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रुपाने विदर्भातील नेतृत्वात जो विश्वास दाखविला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डा, गृहमंत्री श्री. अमितजी शाह, केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वमान्य लोकनेते ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासाठी सर्वांचे धन्यवाद.
श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उत्तमरित्या आगेकूच करित राहिल, असा विश्वास ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.