Published On : Thu, Mar 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

लोकसभेसाठी भाजप राज ठाकरेंच्या मनसेसोबत करणार हातमिळवणी!

Advertisement

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षाची ताकद वाढण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. नुकतीच भाजपने २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला. यातच आता महायुतीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली असून मुंबईतील १ जागा महायुती मनसेला सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतल्या ६ जागांपैकी ५ जागांवर भाजपा तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे. मात्र भाजपा आपल्या कोट्यातील १ जागा मनसेला देणार असे बोलले जात आहे. दक्षिण मुंबई ज्याठिकाणी सध्या अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या जागेवर मनसेचा उमेदवार निवडणूक लढणार असे बोलले जात आहे. यासंदर्भांत लवकरच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. लोकसभा मतदारसंघनिहाय दौरा करत शाखांना भेटी देत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करत आहे. त्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहचा, संपर्क वाढवा, लोकसभा निवडणुकीबाबत येत्या ३-४ दिवसांत मी भूमिका स्पष्ट करतो असे सांगितले होते. यातच आता ते भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

Advertisement
Advertisement