Published On : Fri, Jun 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

भाजप एनडीएसाठी मनसेला बनविणार बुस्टर;फडणवीस -राज ठाकरेंच्या जवळीकने चर्चेला उधाण

Advertisement

– आगामी २०२४ च्या लोकसभा निडवणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात लहान पक्षांना एनडीएच्या आघाडीत आणण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून, सत्ताधारी भाजपने पुन्हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. यानंतर भाजप -मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र याबाबत दोन्ही पक्षांनी चुप्पी साधली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यांच्या भेटीची पुष्टी करताना फडणवीस म्हणाले, “काही वेळापूर्वी आम्ही भेटू, असे ठरले होते. म्हणून, मी शेवटी राजला भेट दिली. ती एक अराजकीय भेट असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर काही वेळातच फडणवीस यांनी राज यांची भेट घेतली.
भाजपच्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर, पक्षाच्या हायकमांडने त्यांच्या राज्य घटकांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीची युद्धपातळीवर तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या समर्थनाचा आधार वाढवण्यासाठी आणि त्यांची व्होट बँक वाढवण्यासाठी, त्यांनी राज्य युनिट्सना लहान पक्षांनासोबत घेत युती करण्याचे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. येत्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे. मात्र भाजप -शिंदे युतीला महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे.

छोट्या पक्षांमध्ये, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आधीच भाजपचा सहयोगी आहे, तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, एनडीएचा माजी सहयोगी, येत्या निवडणूका स्वबळावर लढणार आहेत. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मनसेला आपल्या बाजूने घेण्यास उत्सुक आहे. उद्धव ठाकरे गटाला तगडे आव्हान देण्यासाठी भाजप धडपड करीत आहे.

भाजपच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले की, मनसेने जर भाजपसोबत हातमिळवणी केली तर त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंच्या गटाला बसेल. भाजपाला असे वाटते की राज ठाकरे यांची राजकीय ताकद आहे. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. राज यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीर सभांद्वारे एनडीए विरोधी वातावरण तयार करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली होती. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा मोठा फायदा झाला होता. राज यांनी 9 मार्च 2006 रोजी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर मनसेची स्थापना केली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 288 जागांपैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तथापि, 2019 च्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकून पक्ष तेव्हापासून घसरत चालला आहे. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत, मनसेचे सहा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र त्या नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

मनसेचे राजकारण सध्या हिंदुत्व विचारसरणीकडे वळले.
या वर्षी मार्चमध्ये गुढीपाडव्याच्या (महाराष्ट्रीय नवीन वर्षाच्या) निमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत राज यांनी त्यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मी याबद्दल कधीच बोललो नव्हतो. पण माझी शिवसेनेतून बाहेर पडण्याची खात्री करण्यासाठी डावपेच आखण्यात आले होते, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. सेनेतून बाहेर पडण्यासाठी उद्धव आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक ज्येष्ठ सेनेचे नेते जबाबदार असल्याचा आरोप राज यांनी केला आहे. बीएमसीमधील उद्धव सेनेचे वर्चस्व संपुष्टात आणणे हे भाजपचे लक्ष्य आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकादरम्यान मराठी मते आपल्याकडे वळण्यासाठी भाजप मानसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

भाजपच्या एका रणनीतीकाराने सांगितले की, “जर मनसे बीएमसीमध्ये 25-30 जागांवर उद्धव सेनेला कडवी झुंज देऊ शकते, तर हे भाजपासाठी फायद्याचे ठरेल. मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, “फडणवीस आणि राज यांच्या भेटीत नेमके काय घडले ते उघड करता येणार नाही. पण प्रत्येक नेता पक्षाच्या विस्तारासाठी झटत असतो. युतीसाठी दोन्ही पक्षांना परस्पर चर्चा केली पाहिजे.

भाजप-मनसे समीकरणांचा बारकाईने मागोवा घेत राष्ट्रवादीच्या एका नेत्याने आपले मत मांडले. भाजपच्या कर्नाटक पराभवानंतर आणि आरबीआयच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी केंद्रावर कशी टीका केली होती, हे सर्वांना माहीत असल्याचे ते म्हणाले.

Advertisement