नागपूर : काँग्रेस नेते राहुल यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद पेटला आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत.भाजप हिंसा पसरवत आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
नागपुरातही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधीविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल यांचा पुतळाही जाळण्यात आला.
संसदेत काय म्हणाले राहुल गांधी? मोदी एकदा त्यांच्या भाषणात म्हणाले होते की भारताने कधीही कुणावर हल्ला केला नाही. याचे कारण आहे ते म्हणजे आपला हिंदुस्थान हा अहिंसा मानणारा देश आहे. आपल्या देशात होऊन गेलेल्या महापुरुषांनी हा संदेश दिला आहे की घाबरवू नका आणि घाबरु नका.
भगवान शंकरही हेच म्हणतात घाबरु नका, घाबरवू नका त्यानंतर ते त्रिशूळ जमिनीवर मारतात. दुसरीकडे जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा करतात आणि तिरस्कार पसरवतात. तुम्ही हिंदू नाहीच. हिंदू धर्मात हे स्पष्ट लिहिलं आहे की तुम्हाला सत्याची कास सोडायची नाही,असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.