Advertisement
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची नागपुरातील निवास्थानाबाहेर गर्दी केली आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गडकरी यांची खास लाडू तुला करण्यात आली.
जनतेचा विश्वास आणि प्रेम माझ्या पाठीशी आहे.लोकसभा निवडणूक आपण चांगल्या मतांनी निवडून येऊ, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो भाजप कार्यकर्ते पोहोचले होते. इतकेच नाही तर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचून गडकरी यांची वाढदिवस निमित्त भेट घेऊन शुभेच्छा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.