कोणीही उपाशी झोपू नये या अभिनयाला सुरुवात.
रामटेक: संपूर्ण देश आज कोरोना मुळे त्रस्त झाला आहे.संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे अश्या वेळेस रोज मजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रामटेक तालुका अंतर्गत गरीब रोजमजुर तसेच झोपड़पट्टी मधे ज्यांच्याकड़े राशनकार्ड नाही अश्या गरीब परिवारला मोफत राशन वितरण करण्याचे उद्देश्य ठेऊन माननीय माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , तसेच जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,युवामोर्चा उपाध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांच्या मार्फत रोज सैकडो लोकांपर्यंत मोफत तांदूळ तसेच डाळ मोफत वाटप सुरू आहे लॉकडाऊन् झाल्यानंतर अश्या गरीब रोजमजुरांची खूपच परिस्थिती नाजूक आहे हे लक्षात घेत रोजमजुरपर्यंत मोफत अन्नं मिळाव कोणी उपाशी झोपू नये हाच संकल्प मनात घेऊन निरंतर सेवा देत आहेत यासाठी प्रयास विनायक बांते , रजत गजभीये तसेच युवा मित्र मंडळी दिवसभर मेहनत घेत आहेत यांनी अजून सर्व लोकांना मदतीसाठी समोर यावे स्वतः अ श्या लोकांची मदत करावी असे आवाहन देखील केले आहे.