Advertisement
सावनेर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आशिष देशमुख बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अनुजा केदार यांना केले पराभूत केले.देशमुख यांच्या विजयाचा जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचा जोर प्रचंड प्रमाणात दिसून येतो आहे. कारण २०० हून जास्त महायुतीने आघाडी घेतली आहे. लाडकी बहीण योजना, तसंच विकासाचे मुद्दे, बटेंगे तो कटेंगे यासारख्या घोषणांमुळे महायुतीला मोठा फायदा झाला. लोकसभेत खरंतर भाजपासह महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र त्याचा वचपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीने काढला असल्याचे चित्र आहे.