Advertisement
नवी दिल्ली:दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला लागला. यामध्ये भाजपला बहुमत मिळाले.त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.
परंतु, गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अखेर बुधवार (दि.19) फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली.
यात सर्वानुमते रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय बोर्डाने दोन पर्यवेक्षकांना ही जबाबदारी दिली होती.
यात माजी मंत्री रविशंकर प्रसाद आणि माजी मंत्री ओम प्रकाश धनखड़ यांचा समावेश होता. दिल्ली विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. अखेर यात रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.