मुंबई:आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा दिला होता.
मात्र आता विधासभेसाठी मनसे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या शिवडी विधानसभेतून तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली.