Published On : Mon, Feb 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपाचा जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन

नागपुर:- भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर होता. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषद सभागृहाबाहेर त्याची होळी केली. निषेधाचा हा सनदशीर मार्ग असताना देखील, तसेच भाजपाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले आहे. तसेच, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सुनील केदारांचे समर्थन करण्यासाठी विकासपुरुष,देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या फोटोला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार केला.

या सगळ्याच्या निषेधार्थ, आज सर्व संतप्त नागपूर शहर व जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. जील्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात या आंदोलनातुन भाजपाची मागणी होती की, देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या काँग्रेसी माथेफेरूंना त्वरित अटक व्हावी. तसेच, कोर्टाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्यांच्या प्रतीमेला काळे फासने हा गुन्हा असतांना कॉग्रेस कडुन त्याचे समर्थन होते हे सर्व निषेधार्य आहे.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजच्या आंदोलानातील प्रमुख मागण्या होत्या की, देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या होडींगला जाणीपुर्वक काळे फासण्या-या कॉग्रेसी कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करावी. कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदारांची प्रतीमा जिल्हापरीषद कार्यालयातुन त्वरीत हटवण्यात यावी. कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदार यांना जिल्हा परिषदेची संबंधित कोणती आहे कार्यक्रमाला बोलावण्यात येऊ नये. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावरील पुस्तिकेत माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो छापण्यात आला आहे ही चुकीची प्रथा असून अर्थसंकल्पावरील पुस्तके वरून तो फोटो तात्काळ हटवण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी ह्या मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात प्रमुख्याने माजी आमदार जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आमदार प्रवीण दटके,भाजपा महनगर अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे, आमदार समीर मेघे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,आशीष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे, डॅा. मिलींद माने, पूर्व अध्यक्ष अरविंद गजभिये, राजीव पोतदार, चरणसिंग ठाकूर, महामंत्री अश्विनी जिचकार, अनिल निदान
किशोर रेवतकर, शिवानी दाणी वखरे, विष्णू चांगदे , बादल राऊत, संजय बंगाले, श्रीपाद बोरीकर, किशोर वानखेडे, विक्की कुकरेजा, सतीश सिरस्वान आणि सैकड़ो ग्रामीण व महानगराचे भाजपा पधाधिकारी कार्यकृते उपस्थित होते.

Advertisement