Advertisement
मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला. या विजयानंतर भाजपाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत भाजपानं खास रणनीती आखली आहे.
तसेच या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्रित केले. यानुसार भाजपकडून पुणे, मुंबई आणि विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवरून मतभेद सुरु आहे. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असून ताकदवान नेत्याला याठिकाणी उमेदवारी देण्यात आली. आहे.
यामध्ये मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांची समावेश असून भाजप नेत्यांनी याठिकाणी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.