नागपूर : शहरातील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) उघडकीस आणला आहे. गेल्या अनेक दलालांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवण्यात येत होते.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत रेल्वेचे लिपिक आणि विमानतळ अधिकाऱ्यांची मिलीभगत असलेले रॅकेटचा पर्दाफाश आरपीएफकडून करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्लर्क अनेक वर्षांपासून तिकिटांचा काळाबाजार करत होता. तो बाहेरील दलालांच्या संपर्कात होता तसेच त्याने विमानतळ अधिकाऱ्यांशी हातमिळवणीही केली होती.