Advertisement
मुंबई: रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये काळा पाऊस बरसला असून सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत हा पाऊस झाल्याने स्थानिकामध्ये भितीचे वातावरण आहे. तर वाढत्या प्रदुषणामुळे असा पाऊस झाल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास उरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पाऊस हा स्थानिकांना अचंबित करणारा होता. कारण, यावेळी झालेला पाऊस हा चक्क ‘काळ्या’ रंगाचा असल्याचे दिसून आला. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच भितीचे वातावरण पसरले.
गेल्या दोन दिवसापासून परिसरात काळ्या रंगाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे उरण येथील रहिवासी मात्र काहीसे चिंतातुर झाले आहेत. या घटनेचे नेमके कारण शोधण्याची मागणी त्यांनी केली आहे.