नागपूर : नागपूर शहर जिल्हा काॅग्रेस कमेटी मध्य ब्लाॅक 16 आणि द.पश्चिम ब्लाॅक 7 की कार्यकारिणी आढावा बैठक काल पार पडली. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार,डाॅ.गजराज हटेवार,रमन पैगवार प्रदेश सचिव कमलेश समर्थ,बंटी शेळके,नंदा पराते,उमेश शाहू,प्रकाश ढगे,महेश श्रीवास,अण्णाजी राउत,पिंटू बागडी,महिला अध्यक्षा नॅश अली,मध्य ब्लाॅक अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर,द.पश्चिम ब्लाॅक अध्यक्ष पंकज थोरात,गुडडू अग्रवाल,जाॅन थामस आदींची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये सर्व प्रथम ब्लाॅक अध्यक्ष द्वारा प्रभाग अध्यक्ष बुथच्या नियुक्तीचे पत्र माजी केद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. ब्लाॅक अध्यक्षानी ब्लाॅक मध्ये केलेल्या कार्याचा आढावा दिला.
विकास ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, ब्लाॅक अध्यक्षांचे पद महत्वपूर्ण आहे. आपल्या ब्लाॅक मध्ये प्रभाग,बुथ,बीएलएचे कार्य पूर्ण करावे. ब्लाॅक अध्यक्षांनी ब्लाॅक मध्ये बुथ अध्यक्ष,प्रभाग अध्यक्षांच्या बैठका घ्यावा. शहरात 2200 बुथ आहे जर प्रत्येक बुथ मजबूत केला तर नक्कीच काॅग्रेस जिंकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर प्रभाग व वार्डातील नागरिकांच्या समस्या लक्षात घ्या. वस्तीतील काम करा. इलेक्ट्रीक बिल वाढ, निष्क्रिय दर्जाचे रस्ते, वार्डात सर्वत्र कचरा पडलेला आहे त्यामुळे डेंगूच्याआजार वाढत आहे. यासाठी आपण कठोर पाऊले उचलली तर नागरिकांचा काॅग्रेसला प्रतिसाद मिळेल.संघटन बळकटीवर लक्ष दया.येत्या काळात लोकसभा,विधानसभा,मनपा निवडणूक आहे.ज्या ब्लाॅक अध्यक्षांनी आपला ब्लाॅक मजबूत केला त्यांचा मनपा मध्ये विचार करण्यात येईल.
माजी केंद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांनी प्रत्येकाचा परिचय घेत काँग्रेसच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. येत्या 3 तारखेपासुन जनसंवाद पदयात्रा विधानसभा निहाय होतील. त्या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा. भाजप सरकार दलित,वंचित,अल्पसंख्याक,आदिवासीचे नाही तर फक्त सुटबुटवाल्यांचे सरकार आहे. हे सरकार प्रचंड विजेचे बिल वाढवून सामान्य नागरिकांना तिघाडी सरकार लुटत आहे.ना खाऊॅगा ना खाने दुगा म्हणणाऱ्या मोदी सरकारने राफेल विमान खरेदी घोटाळा,रस्ते बांधण्यात घोटाळा,नोटबंदी,भष्ट्राचार महागाई,बेरोजगारीसारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. हे नागरिकांना समजावून सांगा. गरीबांचा विचार करणारा केवळ काँग्रेस पक्ष आहे. आपण काॅग्रेसचे एकनिष्ठ सदस्य आहात आपण केलेल्या कार्याचा फायदा पक्षाला मिळेल असे मला वाटते, असे मुत्तेमवार म्हणाले.आम्ही ब्लाॅक निहाय बैठकीचे आयोजन 21 पासून करीत असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीला सुनील जाधव, रीना चव्हाण,पुरुषोत्तम पारमोरे,दुर्गेश प्रधान,पुरुषोत्तम गौरकर,हेमंत चैधरी,ओमप्रकाश महंतो,दिलीप खैरवार,मनोज चवरे,प्रशांत धाकणे,संध्या चवरे,लता भोयर,दिगांबर कामळे,उदय देशमुख,नीता यादव,विनोद नागदेवते,मुकेश हेडावू सहित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.