Advertisement

द्वेषातून संघर्ष, गुरुद्वारा कमेटीवर वर्चस्वाचा वाद-
सूत्रांच्या माहितीनुसार, हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा गुरविंदर सिंगच्या नेतृत्वाखालील ६-७ जणांच्या गटाने सुखराज सिंगला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुखराज सिंग गेल्या काही वर्षांपासून गुरुद्वारा कमेटीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत होते, त्यामुळे हा वाद वाढत गेला.
गुरविंदर सिंग उर्फ गुल्लू ढिल्लोंवर आरोप आहे की, ते मागील १२-१३ वर्षांपासून बाबा दीप सिंह नगर गुरुद्वारा कमेटीवर ताबा मिळवून आहेत. सुखराज सिंगच्या म्हणण्यानुसार, गुरविंदर आणि त्यांचे सहकारी कमेटीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी धमक्या आणि दादागिरीचा वापर करत आहेत. यामुळे अनेक श्रद्धाळूंनी गुरुद्वाऱ्यात जाणेही कमी केले आहे. जेव्हा सुखराज सिंग यांनी या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, तेव्हा हा वाद विकोपाला गेला आणि रक्तरंजित झटापट झाली.
पोलिसांकडून कारवाईला सुरुवात –
या हल्ल्यात सुखराज सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच, त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनाही संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. कपिल नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात या वादातून मोठी गँगवार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणात पुढील पोलिस कारवाईची प्रतीक्षा आहे.