Published On : Mon, Jun 24th, 2024

मुख्यमंत्र्याच्या भंडारा दौऱ्यावेळी वैनगंगा नदीवर पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली; मोठा अनर्थ टळला

Advertisement

नागपूर:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी वैनगंगा नदीवर पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मात्र प्रसंगवधाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.बचाव पथक वेळेवर पोहचल्याने पत्रकारांचा जीव वाचला.इतर बोटीही मदतीसाठी धावून आल्या. मुख्यमंत्री शिंदेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत अनेक चॅनलच्या न्यूजच्या कॅमेरा युनिटचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याच वेळी हा अपघात घडला आहे.

Advertisement

या भंडारा दौऱ्या दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटून तिचे तीन तुकडे झाल्याचे समोर आले. दरम्यान वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

येथील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्र शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.