कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहिवासी एक 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय तरुणीने प्रेमप्रकरणातून दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडून काल रात्री 8 च्या जवळपास कन्हान रेल्वे पुलियाजवळील 100 मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यानी हातात हात घालून हावडा अहमदाबाद धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव आदित्य लक्ष्मीनारायन कुरील वय 18 वर्षे रा जयभोम चौक कामठी तर मृतक मुलगी ही 16 वर्षाचो अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सदर दोन्ही मृतक तरुण तरुणी एकाच परिसरात जयभीम चौकात वास्तव्य करीत असून एकमेकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे प्रेमात बदलले या प्रेम प्रकरणाची कुणकुण सुरू होती दरम्यान दोघांनी दोन दिवसापूर्वी घरून बेपत्ता झाल्याने मुलीच्या घरमंडळीने कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असता पोलिसांनी मिसिंग ची तक्रार नोंदवित तपासाला गती दिली मात्र कुठेही थांगपत्ता लागला नव्हता तर काल रात्री या दोघांनीही सदर घटनास्थळी जीवनाचा कायमचा निरोप घेत हातात हात घालून रेल्वेगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली .घटनास्थळच्या बाजुला एम एच 40 डी 2678 दुचाकी मिळाली असून ही दुचाकी मृतकाच्या मोठ्या भावाची असल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर श्वविच्छेदनार्थ मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.
मृतक आदित्य कुरील च्या पाठीमागे एक आई, एक मोठा भाऊ व एक बहिण असा आप्तपरिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून परोसरात एकच चर्चेचा विषय ठरीत शोककळा पसरली आहे.