Published On : Mon, Apr 5th, 2021

ब्रेक दी चेन : मेट्रो ट्रेनच्या वेळेमध्ये बदल

Advertisement

– सोमवार ते शुक्रवार दर १५ मिनिटांच्या ऐवजी दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु,शनिवार व रविवार दर १ तासांनी प्रवासी सेवा उपलब्ध राहील

नागपूर : कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता महा मेट्रोच्या वतीने वेळोवेळो योग्य उपाय योजना केल्या जात आहे. “ब्रेक दी चेन” कोविड १९ अंतर्गत कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करण्याकरिता महा मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये बदल करण्यात येत आहे. सध्यस्थितीत दर १५ मिनिटांनी ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु आहे. मंगळवार दिनांक ०६ एप्रिल २०२१ पासून या मार्गिकेवरील प्रवासी सेवा दर १५ मिनिटांच्या ऐवजी दर ३० मिनिटांनी सोमवार ते शुक्रवार पर्यंत उपलब्ध असतील तसेच शनिवार आणि रविवारला या प्रवासी सेवा दर ३० मिनिटांच्या ऐवजी १ तासाने उपलब्ध असेल.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे शहरात कडक निर्बध लागू असून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध करण्याचा महा मेट्रो द्वारे योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे शहरात कडक निर्बध लागू असून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध करण्याचा महा मेट्रो द्वारे योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहे. महा मेट्रो तर्फे ५० टक्के यात्रि क्षमता प्रमाणे ऑरेंज आणि ऍक्वा लाइन वर मेट्रो सेवा सुरु आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षासंबंधी आवश्यक उपाय योजना प्रभावी पणे लागू आहेत. विषम परिस्थिती मध्ये प्रवाश्यांकरता मेट्रो परिवहन सेवा उपयुक्त असून मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहे व मेट्रो स्टेशन व ट्रेनमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात आहे.

महा मेट्रोच्या सर्वच स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांचे तापमान तपासत त्यांना सेनेटाईजर दिले जात आहे. या शिवाय खापरी, सिताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर स्टेशन येथे पोहचल्यावर गाडीला सेनेटाईज करण्याकरता कर्मचारी तैनात आहेत. गाडी रवाना होण्यापूर्वी प्रत्येक कोच मधील सीट, खिडकी, हैंडल बार, दरवाजा सेनेटाईज केला जातात. या शिवाय, खापरी आणि लोकमान्य नगर डिपो येथे पहले स्वयंचलित मशीनच्या माध्यमाने गाडीची आंतरिक और बाहेरील सफाई करत संपूर्ण गाडीला सेनेटाईज केले जाते.

मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान स्टेशनच्या प्रवेश द्वारावर तपासले जात आहे. ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल अश्या प्रवाश्यांना प्रवास करण्यास सक्त मनाई आहे. सोशल डिस्टंसीग संबंधी मानकांचे पालन करण्याकरिता स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्मसह मेट्रो गाडीत त्या संबंधी दिशा-निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जात आहे उपकरणांना स्पर्श कमी व्हावा या करीत हे पाऊल उचलण्यात आले आहे. महा मेट्रो ऍपचा वापर करावा या करता प्रवाश्याना माहिती देण्यात येत आहे. महा मेट्रो तर्फे डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावे याकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. जमा झालेली रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जात असून येणारी तसेच जाणारी रोख-रक्कम वेगळी ठेवण्यात येते. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात केले जात आहे.मेट्रोचे कर्मचारी हॅन्ड ग्लोव्ह ,मास्क परिधान करीत आहे . या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येत आहे .

Advertisement
Advertisement