Published On : Sun, Sep 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

लाचखोर पत्रकार सुनील हजारी यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

नागपूर : पत्रकार सुनील सुकलाल हजारी (44) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) एजंटकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार हजारी यांना सदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. हजारी नामी वृत्तपत्रात चीफ एडिटर म्हणून काम करतात. हजारी यांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.पोलीस कोठडी वाढवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून एमसीआर लावण्यात आला. यादरम्यान आरोपी हजारी यांच्या वकिलांनी न्यायालयात जमीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरटीओतील एजंट धनराज ऊर्फ टिटू शर्माने (५५, बाबादीपसिंहनगर) याने दिलेल्या तक्रारनुसार पत्रकार हजारी याला खंडणी घेतांना अटक करण्यात आली आहे. शर्मा अनेक वर्षांपासून ग्रामीण आरटीओशी जुळला आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओमधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात संबंधित शर्माची काय भूमिका आहे याबाबत हजारीने वृत्त प्रकाशित केले होते.याच प्रकरणातील बातमी प्रसिद्ध न करण्याच्या बदल्यात आरोपीने संबंधित शर्माला १० लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर सात लाखांत डील झाली.

२८ ऑगस्ट रोजी शर्माने त्याला एक लाखांचा पहिला हप्ता दिला होता. मात्र, त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसल्याने शर्माने सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. उपायुक्त राहुल मदने यांच्या निर्देशांवरून सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. गुरुवारी आरोपी हजारी ८० हजार रुपये घेण्यासाठी व्हीसीए स्टेडियमजवळील चहाच्या टपरीजवळ पोहोचला. तेथून दोघे एका आईसक्रीमच्या दुकानात गेले. तेथे पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली.

Advertisement
Advertisement