नागपूर – शहारातील धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तकीया वस्तीत एका तरुणाच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव २० वर्षीय लकी राजू तपन असून या प्रकरणात त्याचा जुना मित्र कुणाल राऊत, कुणालची पत्नी, मेहुणा आणि आणखी एका व्यक्तीची नावे समोर आली आहेत.
मैत्रीतील दुरावा घातक बनला-
मिळालेल्या माहितीनुसार, लकी आणि कुणाल हे जुने मित्र होते. अनेकदा एकत्र वेळ घालवत असत. पण कॉलनीतील लोक लकीच्या अपशब्दामुळे त्रस्त होते. या प्रकरणावरून लकी आणि कुणालमध्ये बरेच वाद झाले.
प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू-
काल रात्री लकी आणि कुणालमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यादरम्यान कुणाल, त्याची पत्नी, मेहुणा आणि आणखी एका व्यक्तीने मिळून लकीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. लकीच्या पोटात आणि शरीराच्या इतर भागात अनेक वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तपास केला सुरू –
घटनेची माहिती मिळताच धंतुली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
परिसरात दहशतीचे वातावरण-
या घटनेनंतर तकिया वस्तीतील स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.धंतोली पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल.पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.