संत शिरोमणी गुरू रविदास यांची 624 वी जयंती संत रविदास छात्रालय हनुमान नगर परिसरातील संत रविदास मंदिरातील त्यांच्या पुतळ्याला नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा महिला प्रभारी वर्षा वाघमारे, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, माजी जिल्हा प्रभारी ज्ञानेश्वर बसेशंकर, शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संत रविदास छात्रालय च्या सभागृहात जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या छोटेखानी सभेत नागपूर जिल्हा बसपा महिला आघाडीच्या प्रभारी वर्षाताई वाघमारे, नागपूर शहर प्रभारी चंद्रशेखर कांबळे, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण- पश्चिम नागपूरचे अध्यक्ष ओपूल तामगाडगे, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांनी तर समारोप नागपूर जिल्हा सचिव नितीन वंजारी यांनी केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, अरविंद तायडे, युवराज जगणे, पूर्व नागपूर चे प्रभारी सागर लोखंडे, दक्षिण- पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, मध्य नागपूर चे माजी अध्यक्ष अभय डोंगरे, हर्षवर्धन डोईफोडे, महासचिव विशाल बनसोड, दक्षिण चे महासचिव विकास नारायणे, माजी महासचिव सुरेंद्र डोंगरे, प्रकाश फुले, विकास कांबळे, धीरज पाटील, भानुदास ढोरे, सचिन कुंभारे, शामराव तिरपुडे, आशिष आवळे, अमन गवळी, परेश जामगडे, विवेक सांगोळे, स्नेहल उके आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.