बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 ला आपल्या कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांना 50% आरक्षण देऊन आरक्षणाची सुरुवात केली. तो दिवस *आरक्षण दिवस* म्हणून नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने संविधान चौकात राजर्षी छत्रपती शाहू व बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून साजरा करण्यात आला.
राजर्षी शाहू यांनी आजपासून 120 वर्षांपूर्वी आपल्या कोल्हापूर संस्थानात ब्राह्मण, कायस्थ, प्रभू, शेणवी, पारशी व पुढे गेलेल्या जाती सोडून उरलेल्या सर्व मागासवर्गीय जातींना 26 जुलै 1902 रोजी आपल्या जन्मदिनाची भेट म्हणून एक अध्यादेश काढून 50% आरक्षण लागू केले होते. भारतीय संविधानाने आरक्षण धोरण स्वीकारले. आज देशात ग्रामपंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत, जिल्हा न्यायालया पासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत व प्रादेशिक पक्षापासून तर राष्ट्रीय पक्षापर्यंत सर्वच ओबीसींना आरक्षण मिळावे या मताचे दिसतात. त्यावर सुप्रीम कोर्टाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. त्यामुळे त्या घटनेची आठवण म्हणून बहुजन समाज पार्टीने या आरक्षण दिनाला अधिक महत्त्व दिले.
आरक्षण दिन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश बसपा चे कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे, विजयकुमार डहाट, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार ह्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांनी, संचालन जिल्हा महासचिव प्रताप सुर्यवंशी ह्यांनी तर समारोप जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग ह्यांनी केला
2022 हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री यांनी *हरघर तिरंगा* या मोहिमेची सुरुवात केली असताना बसपा नेते उत्तम शेवडे यांनी या मोहिमे सोबतच शासनाने *हरघर संविधान* ची मोहीम राबवावी अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. अलीकडे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संविधानावर चर्चा होत असल्याने *हरघर सविधान ची मोहीम केंद्राने, राज्याने व स्थानिक स्वराज्य संस्थेने सुरू करावी* असे झाल्यास सर्वसामान्यांना संविधान समजेल जेणेकरून देश संविधानाने चालेल व देशात खुशहाली नांदेल अशीही पुष्टी बसपा नेत्यांनी जोडली.
याप्रसंगी माजी नगरसेवक संजय जयस्वाल, विकास नागभिडे, गौतम पाटील, सागर लोखंडे, महेश साहारे, किशोर गेडाम, राजकुमार बोरकर, सुरेश मानवटकर, नितीन वंजारी, योगेश लांजेवार, जगदीश गजभिये, शंकर थुल, जितेंद्र मेश्राम, चंद्रशेखर कांबळे, ऍड अतुल पाटील, मनोज गजभिये, सनी मून, सदानंद जामगडे, अभय डोंगरे, प्रवीण पाटील, सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, माया उके, प्रा सुनील कोचे, विवेक सांगोडे, विलास मून, वीरेंद्र कापसे, उमेश मेश्राम, ओपुल तामगाडगे, वामन सोमकुवर, प्रा गोवर्धन रामटेके, राजेंद्र सुखदेवे, अड सुरेश मेश्राम, भानुदास ढोरे, अनिल मेश्राम, संभाजी लोखंडे, सचिन मानवटकर, जयेश गेडाम, मयूर पानतावणे, बाळू मेश्राम, राजरत्न कांबळे, जितेंद्र पाटील, भैयालाल गजभिये आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.