कामठी :-आद्य परिचारिका फ्लाँरेन्स नाईटिगेंल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो .या दिनाचे महत्त्व जाणून बहुजन समाज पार्टी च्या वतीने कामठी स्थित उपजिल्हा रुग्णालय येथील परिचारिका भगिनींचा सत्कार करून जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. बसपाचे वरिष्ठ नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते सर्व परिचारिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब म्हणाले खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण लाखो रुपये खर्च करून मृत्युमुखी पडले व शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका भगिनी व डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात टाकून कोरोना रुग्ण चा जीव वाचविला आहे या शब्दात परिचारिका व डॉक्टरांची स्तुती केली.
याप्रसंगी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नयना दुपारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रद्धा भाजीपाले, बसपा कामठी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि.विक्रांत मेश्राम, कामठी शहर महिला विंग अध्यक्षा सुनीता ताई रंगारी, कामठी शहर बसपा महासचिव निशिकांत टेंभेकर, विशाल गजभिये, प्रामुख्याने उपस्थित होते.